Share

‘सावरकरांच्या विरोधकांना चौकात घेऊन फटकावले पाहिजे’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या विरोधकांना भर चौकात फटकावले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आज पिकविमा कंपनीच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, ते सावरकरांचा विरोध करतात अशा सगळ्यांना एकदाच चौकात घेऊन फटकावले पाहिजे. त्याच्या शिवाय स्वातंत्र्यासाठी कोणी किती कष्ट घेतले आहे हे त्यांना कळणार नाही. सावरकरांचा अपमान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील केला होता. त्यामुळे अशा अवलादीला स्वातंत्र्याच मोल कळणार नाही.

सावरकरांच्या पुतळ्याच्या विटंबने नंतर राज्यातील आणि देशातील वातावरण अस्थिर झाले आहे. सावरकर समर्थकांनी सदर घटनेचा निषेध केला आहे.तर सावरकरवाद्यांनी सोलापुरात कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या फोटोला काळ फासण्यात आले आहे. तसेच अनेक नेत्यांनी सावरकर घटनेने बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमुल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत असे कृत्य करणे हे वाईट आहे. सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची समाजाने दखल घेतली पाहिजे. असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!