Share

बनावट नंबर टाकून फिरणारा निघाला सराईत वाहनचोर 

Published On: 

औरंंगाबाद : लासूर स्टेशन येथून चोरी केलेली दुचाकी तीन महिन्यांपासून वापरत असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास तीसगाव चौफुली येथे करण्यात आली.

अप्पासाहेब विठ्ठल राऊत (वय ३५, शहापूर घोडेगाव, ता. गंगापूर) असे दुचाकी चोराचे नाव आहे. तो चोरीच्या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकुन वापरायचा. लासूर स्टेशन येथून अप्पासाहेब राऊत याने दुचाकी चोरली होती. ही दुचाकी तो गेल्या तीन महिन्यांपासून वापरत होता. तसेच पोलीस पकडण्याची भिती वाटत असल्याने त्याने दुचाकीचा क्रमांक बदलला होता.

दरम्यान, बुधवारी दुपारी गुन्हे शाखेचे जमादार शेख हबीब, विजय निकम आणि पोलीस नाईक राजेंद्र साळुंके हे गस्तीवर असताना त्यांनी संशयावरुन अप्पासाहेब राऊतला थांबवले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, ही दुचाकी नातेवाईकाच्या नावावर असल्याची त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन खात्री केल्यावर तिच्यावरील क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र साळुंके यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!