मुंबई : गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर रशियाने हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे युक्रेनमधली परिस्थिती भीषण होत चालली आहे. त्यात युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत भारतात आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. मात्र युक्रेन येथील भारतीय दुतावासाची काहीही मदत झाली नाही, असा आरोप युक्रेन येथून परतलेल्या एका विद्यार्थिनीने केला आहे.
“मी खूप हॅप्पी आहे कारण मी घरी आले. तिथली परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. आम्हाला २४ तारखेला माहीती पडलं की युक्रेनला बॉम्ब पडले आहेत . मी वेस्टर्न सिटीमध्ये असल्यामुळे आम्हाला सेफ वाटत होतं, पण तिथेही आम्ही सेफ नव्हतो. कारण आमच्या ऑनलाइन क्लासमध्ये मॅडमनी सांगितलं की, आपले एअरपोर्ट उडवण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही सिनीयर्सच्या मदतीने रोमानिया बॉर्डरजवळ गेलो. पण रोमानिया बॉर्डरच्या १० किमी आम्ही लांब होतो. तिथेच आम्हाला आमची बस थांबवावी लागली. कारण युक्रेनियन्सची गाड्यांची खूप मोठी लेन होती आणि एका दिवसात एवढ्या गाड्या पास नाही करू शकत, त्यामुळे आम्हाला तेवढे १० किमी चालत जावं लागलं बॉर्डर जवळ. तिथे गेल्यावर पण आम्हाला एक दोन तास थांबाव लागलं. त्यानंतर आम्हाला आत सोडलं, मात्र तिथे आम्ही ५-६ तास इमीग्रेशनसाठी सर्व थांबलो होतो. मुली होतो म्हणून पुढे तरी आलो, मुलांना अजून वेळ लागत होता.” असे प्रचीती पवार या विद्यार्थीनीने सांगितले.
प्रचीती पुढे म्हणाली, “इमीग्रेशन झाल्यानंतर आम्ही एम्बेसीला कॉल लावला. कॉल लावत होतो पण ते अजिबात उचलत नव्हते. एकदा कॉल उचलला तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही युक्रेनची बॉर्डर क्रॉस केली. आता तुम्ही रोमानियाची बॉर्डर क्रॉस करायला मदत करा. पण ते कॉल वर नुसतं येतो येतो म्हणाले, पण काहीच कोणी आलं नाही. मग आम्ही रोमानियन बॉर्डर पण क्रॉस केली. मग तिथे तिकडचे एनजीओ आणि तिकडच्या गर्व्हमेंटनी कॅम्प सेटअप केले होते. तिकडे खाण्याची सोय केली होती. तिथून सुद्धा आम्ही एम्बसीला कॉल केला होता. तेव्हा पण ते म्हणाले की ४ तासात येतो, ५ तासात येतो, पण त्यांचे ते तास संपत नव्हते. मग नंतर ते दुपारी आम्हाला घ्यायला बसेसनी आले, मग आम्ही बसने एयरपोर्टला गेलो. तिथे आम्हाला एम्बसीचे लोकं भेटले. तिकडून पुढे बोर्डिंग वगेरे व्यवस्थित करून दिलं.”
“पण प्रॉब्लेम हा होता की जास्त गरज युक्रेनच्या बॉर्डरवर आहे. तिकडून मुलांना जाऊ देत नाहीत. तिकडे जर एम्बेसी आली तर इंडियन स्टूडेंट्स आरामात निघून जातील. मला इतकच म्हणायचं आहे की गर्व्हमेंटनी बॉर्डरजवळ येऊन त्या मुलांना मदत करावी कारण तिथे खूप मुलांना मारलं पण जात होतं. भरपूर सिटीजमध्ये अजूनही मुलं अडकले आहेत आणि त्यांचा काहीच संपर्क होत नाही. ते मुलं एम्बेसीला कॉल करतायत पण एम्बसी त्यांना काहीच समोरून बोलत नाहीये. एम्बेसी एवढंच म्हणते की, तुम्ही वेस्टर्न भागात या, बॉर्डरजवळ या, पण आम्ही जाणार कसे, कारण सगळे रेल्वे उडवले आहेत एयरपोर्ट उडवले आहेत आणि बसनी रिस्क पण घेऊ शकत नाहीत कारण बॉम्ब पडत आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
हायकोर्टाकडून मलिकांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी ७ मार्चला
‘…जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल’; अतुल लोंढेंचा फडणवीसांना टोला
ठरलं तर! या नावाने खेळवली जाणार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
शेतकऱ्याचा नादच खुळा! फक्त १८ गुंठ्यांमध्ये काढले २ लाखांचे उत्पन्न


