चांदवड : शेतकऱ्यांनी लागवड पद्धती बदलली तर शेतकरी शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. चांदवड तालुक्यातील भरवीर येथील एका शेतकऱ्याला फक्त १८ गुंठ्यात तब्बल २ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रघुनाथ जाधव या शेतकऱ्याने लागवडीची पारंपारिक पद्धत बदलल्यामुळे त्याने १८ गुंठ्यांमध्ये तब्बल २ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल केली. या शेतकऱ्याने वाफ्या ऐवजी बेड पद्धतीने रताळाची लागवड करून कमाई केली.
१८ गुंठ्यांमध्ये जवळपास १० टनांच्या आसपास उत्पन्न –
एका रताळ्याचे वजन तब्बल साडेसहा ते सात किलो पर्यंत होते. हा माल मनमाड मालेगाव येथील बाजारपेठेत विकला गेला. १८ गुंठ्यांमध्ये जवळपास १० टनांच्या आसपास उत्पन्न मिळाले. याला २ हजार प्रतिक्विंटल वीस रुपये किलोचा दर मिळाला. हा माल महाशिवरात्रीच्या अगोदर विकला गेला. या दिवसात रताळांची सर्वत्र मागणी असते याचा अंदाज घेत रघुनाथ जाधव या शेतकऱ्याने ४ महिने आधी रताळांची लागवड केली होती.
खते आणि खर्च –
शेणखताचा आणि पोषक विद्राव्य खतांचा वा केला आणि यानंतर फक्त ८ हजारापर्यंत खर्च आला. या पिकाला पूर्ण होण्यासाठी ४ ते ५ महिने लागतात.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

