🕒 1 min read
नवी दिल्ली: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ मार्च पासून तीन कसोटी सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला बेनॉड-कादिर असं नाव देण्यात आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाते. त्याच प्रमाणे ही मालिका खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिंस आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी आज रावळपिंडी मैदानावर या नव्या ट्रॉफीचे अनावरण केले. रावळपिंडी येथे पहिला सामना शुक्रवारपासून खेळवला जाणार आहे. १९९८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानमध्ये खेळणार आहे.
या अगोदर मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानमध्ये गेला होता. त्यावेळी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली होती. तर दोन सामने अनिर्णीत राहिले होते. बेनॉड हे १९५६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळले होते. त्यांनी आशियात पहिल्यांदाच खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक केले होते. परंतु या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता.
यावेळी ऑस्ट्रेलिया संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानमधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजाना मदत करते. त्यामुळे जलदगती गोलंदाजांची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांचा सराव कसून सुरु आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
