🕒 1 min read
नवी दिल्ली : युक्रेनने NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबवून युक्रेनवर लष्करी आक्रमण केले आहे.याबाबत बोलताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले कि, ”NATO ही अमेरिकाप्रणित लष्करी आघाडी आहे. युक्रेन NATO मध्ये सहभागी झाला तर अमेरिका प्रणित लष्करी आघाडी रशियाच्या भौगोलिक सीमेपर्यंत येऊन ठेपणार आहे. यामुळे रशियाने केलेले लष्करी आक्रमण हे योग्य असल्याचे मत आज रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी व्यक्त केले आहे.
युक्रेनला थेट लष्करी मदत करणे कोणत्याच देशाला शक्य नसले तरी इतर देश आपल्यापरीने युक्रेनला मदत करताना दिसत आहेत. तरी जागतिक पाळीवरील धोका टाळला जावा म्हणून अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनी आपले लष्कर, नौदल आणि हवाईदल मोठया प्रमाणात सज्ज ठेवले आहे. या पाश्चिमात्य देशांच्या लष्करी सज्जतेने रशिया मात्र चांगलाच आक्रमक झालेला दिसला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. ते रशियातील स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले कि, ” रशियाने युक्रेनवर जे आक्रमण केले आहे ते अत्यंत योग्य असून ; युक्रेन जर NATO मध्ये सहभागी झाला तर ते आमच्या देशासाठी अत्यंत घातक ठरणार असून आमच्या देशाच्या सीमेवर अण्वस्त्र येऊन ठेपणार आहेत. युक्रेनकडे अण्वस्त्र असण्याला आमचा नेहमीच विरोध असणार आहे. युक्रेनच्या बाजूने जगातील कोणत्याही देशाने लष्कर उतरवले तर ती तिसऱ्या विश्वयुद्धाची नांदी असणार असून जर हे तिसरे महायुद्ध झाले तर त्यात १०० टक्के अण्वस्त्रांचा वापर केला जाईल त्यामुळे जगाच्याच अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो असे मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :
- हायकोर्टाकडून मलिकांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी ७ मार्चला
- ‘…जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल’; अतुल लोंढेंचा फडणवीसांना टोला
- ‘काँग्रेसच ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करू शकतो’; नाना पटोलेंचा विश्वास
- ‘कापूस ते कापड’ उपक्रम रखडला; उपक्रम लांबणीवर राहिला ,कारण…
- आता शेतमालाला मिळणार योग्य दर्जाचा दर! ‘ही’ नवीन योजना उपलब्ध..

