🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या टेरर फंडिंगचा (Terror Funding) मुद्दाही चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला असल्याचे बघायला मिळत आहे. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.
अतुल लोंढे म्हणाले, प्रिय देवेंद्रजी, इक्बाल मिर्ची या मुंबई बाँब स्फोटातील अतिरेक्याशी संबंधित कंपन्यांकडून भाजपाला आलेल्या या डोनेशनबाबत आपण काही बोलणार आहात का? मिर्ची ची सवय लागली असेल तर सामान्य जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल?, असा खोचक सवाल अतुल लोंढे यांनी फडणवीसांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IPL 2022 : चिन्नाथाला रैना ‘या’ संघाकडून खेळणार? व्हायरल झालेला हा फोटो एकदा पाहाच!
-
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये भारतच पाकिस्तानच्या मदतीला ; काय आहे नेमके प्रकरण
-
सोमय्यांच्या तोंडाला झाकण राहिलेले नाही; विजय वडेट्टीवार यांची टीका
-
‘काँग्रेसच ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करू शकतो’; नाना पटोलेंचा विश्वास
-
संजय राठोड, दाऊद ते नवाब मलिक; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
