🕒 2 min read
सिडनी : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या टेस्टच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विराट कोहली बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत आहे.
क्रिकेट.कॉम.एयू च्या रिपोर्टनुसार रवी शास्त्री यांनी मागच्या 71 वर्षातल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टेस्ट सीरिजवर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी शास्त्री यांनी विराट कोहलीचं भरभरून कौतुक केलं. ’71 वर्षानंतर सीरिज जिंकण्याचं समाधान वेगळंच होतं. विराटने ऑस्ट्रेलियाला घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हरवलं. पुढचा बराच काळ भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता येणार नाही,’ असं शास्त्री म्हणाले.
यावरच रवी शास्त्री आता पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत.कोहलीच्या केलेल्या या कौतुकामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि ही टेस्ट सीरिजही 1-1 ने बरोबरीत आहे, त्यामुळे रवी शास्त्रींना हे वक्तव्य करायची गरज काय होती? असे प्रश्नही चाहते विचारत आहेत.
दरम्यान, रवी शास्त्री हे फार आक्रमक आहेत, त्यामुळे यापुढे त्यांच्या हातामध्ये भारतीय संघाचे भवितव्य सोपवू नये, अशी मागणी यावेळी सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर जर शास्त्री यांनी हटवण्यात आले तर त्यांच्या जागी भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी निवड करण्यात यावी, असेदेखील चाहत्यांनी मागणी केली होती.
On the eve of the SCG Test, Ravi Shastri has claimed the captaincy feats of Virat Kohli in defeating Australia wont be "emulated by another Indian captain for a very long time" https://t.co/J4qvgFe6D4@ARamseyCricket | #AUSvIND pic.twitter.com/yfiPXUpjbR
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021

महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- ऑनलाइन फ्रॉडसंदर्भात राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय !
- ‘मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील “संभाजीनगर” उल्लेखाबद्दल समज देऊ’
- आपल्या गायकीमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज
- ‘मालकीण इटालियन असलेल्या थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now