Share

कोणत्याच भूमिकेवर ठाम नसणे हा राष्ट्रवादीचा इतिहास; मनसेचा घणाघात

Published On: 

मुंबई : राज्यात गणेशोत्सव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. राज्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी सभा, मेळावे टाळावे असं आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती.

मात्र, आंदोलन व दहीहंडी साजरा केल्याने गुन्हे नोंदवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आणि राज्याचे गृहमंत्रीपद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी दिसत नसल्याचे समोर येत आहे. शेख यांच्या कार्यक्रमांना सर्रास गर्दी होत असून कोणत्याही प्रकारची कारवाई देखील होत नसल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादीने गर्दी होणारे कार्यक्रम न घेण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र कोणत्याही भूमिकेवर ठाम नसणे हा राष्ट्रवादीचा इतिहास आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असं यांचं चालू आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची विरोधी पक्षांना तयारी करू द्यायची नाही, स्वतः मात्र तयारी चालू ठेवायची असं षडयंत्र असल्याचं यातून समोर येतंय,’ असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

गणेश आगमन मिरवणूक काढली म्हणून मंडळांवर कारवाई –

शुक्रवारी गणपती आगमनाची मिरवणूक काढल्याप्रकरणी कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार, तर घरगुतीकरिता दोन फुटांची गणेश मूर्ती असावी, अशा सूचना असतानासुद्धा सहा फुटांची गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांवर अशा पद्धतीने पोलिसीखाक्या दाखवला जात असताना शेख यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी राज्यातील पोलीस प्रशासनाला दिसत नाही का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सर्व सामान्य नागरिकांकडून एखाद्या नियमाचं उल्लंघन झालं तर नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यातच आता राज्यात तिसऱ्या लाटेच्या आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणखी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.महेबूब शेख यांना मात्र सर्व नियामांचा विसर पडला असून ते आपल्या सभा बैठका घेत आहेत. त्यांच्या सभांवर कोण बोलणार?, प्रशासन कारवाई कधी करणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!