कोल्हापूर : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. हे सरकार पाच वर्षे टिकेल असं वरिष्ठ नेते वारंवार सांगत असले तरी या तीन पक्षांमधील नेत्यांच्या एकमेकांविरोधातील नाराजी ही अनेकदा समोर आली आहे. हे तीनचाकी सरकार अंतर्गत विरोधाने कोसळेल असा दावा भाजप करत असून नाराजी वेळीच शमवण्यासाठी वरिष्ठ नेते मध्यस्थी करून राज्य पातळीवर आघाडीत बिघाडी होणार नाही याची खबरदारी बाळगत आहेत.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला विचारात घेत नसल्याची तक्रार याआधी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसला मिळणारी दुय्यम वागणूक आणि नाराजी अनेकदा समोर आली असून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हैराण करणं सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काहीही म्हणाले तरी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. काँग्रेस आता पक्ष राहिला नाही. वैयक्तिक निर्णय घेतले जात आहेत. यातील बहुतेकजण सत्ता मिळते ना मग सहन करा असंच म्हणतील,’ असा खोचक टोला लगावत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.
चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरून देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवाल पाटील यांनी केलाय. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे समाज हादरुन गेलाय. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याचा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- आरोपींवर कडक कारवाई होईलच, पण वयात येतानाच मुलांवर संस्कार करणं गरजेचं- रुपाली चाकणकर
- ‘या’ शहरात रात्री ८ च्या आत विसर्जन बंधनकारक; पोलिसांनी जाहीर केली मार्गदर्शक सूचना
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- विघ्नहर्ता पावला : ‘या’ ८ जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

