सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सिंधुदुर्गमध्ये गेले होते. त्यावेळी भाष्य करताना अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
‘संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही’, अशी कोपरखळी अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावली होती. जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.
आता पुढचे टार्गेट हे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल, महाराष्ट्रातील सत्ता असेल. ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचे बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यात मी असे पाहिले नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात, त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांचा काँग्रेस, भाजपवर गंभीर आरोप
- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ‘या’ रोडवर ‘नो व्हेईकल झोन
- जिल्हा बँकेचा निकाल लागताच राणे समर्थकांनी पुन्हा म्याव म्याव करत सेनेला डिवचलं
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील


