🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. सरकारमधील अनेक मंत्र्यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Corona) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोक आली. त्यातच आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असं यशोमती ठाकूर ट्विटरवर म्हणाल्या आहेत.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
दरम्यान, 2 दिवासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांचीही कोरोना चाचणी केली असता दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यातच आता यशोमती ठाकूर या देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. महाविकास आघाडीतील मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून कोणत्याही क्षणी राज्यात लॉक डाऊन जाहीर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
- ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांचा काँग्रेस, भाजपवर गंभीर आरोप
- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ‘या’ रोडवर ‘नो व्हेईकल झोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
