🕒 1 min read
मुंबई : सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सिंधुदुर्गमध्ये गेले होते. त्यावेळी भाष्य करताना अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांची अक्कल काढल्याचे पाहायला मिळाले आहे.
ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
दरम्यान, माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात मी असे पाहिले नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात, त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण
- ज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
- ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांचा काँग्रेस, भाजपवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
