सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीमध्ये (District Bank Election) शिवसेनेचा सुपडा साफ करत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने 19 जागांपैकी 11 जागा जिंकल्या आहेत. भाजपने या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारली असली तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजन तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
‘गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना जागा दाखवली आहे. राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. वरिष्ठ जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काही शिवसेना नाही’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 19 जागा न मिळाल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली आहे. पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली विरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होती. या लढतीमध्ये नाईक यांनी तेली यांचा पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
- ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांचा काँग्रेस, भाजपवर गंभीर आरोप
- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ‘या’ रोडवर ‘नो व्हेईकल झोन
- जिल्हा बँकेचा निकाल लागताच राणे समर्थकांनी पुन्हा म्याव म्याव करत सेनेला डिवचलं
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

