Share

उच्च न्यायालयाने जामीन नाकारला, अर्णबचा कारागृहातील मुक्काम वाढला

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. शनिवारी, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने त्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

अर्णबच्या जामीनावरून आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज देखील अन्वय नाईक प्रकरणातील तिन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हे प्रकरण न्यायालयीन कोठडीचं असून उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. ज्या न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे त्या अलिबाग सत्र न्यायालयात यावर पुन्हा याचिका करावी असं कोर्टाने सांगितलं आहे. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

अर्णबच्या अटकेवर राज्यपालांची नाराजी

कोश्यारींनी अर्णबच्या अटकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. अर्णबला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असं देखील ते म्हणाले आहेत. तर, अर्नबच्या कुटुंबियांना अर्णबला भेटू द्यावे, असा उद्देश देखील त्यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी अर्णबच्या सुरक्षेबाबत व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर थेट राज्यपालांनी मध्यस्थी केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व मंत्री काय भूमिका घेणार याकडं राजकीय राज्यासह देशाचं देखील लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!