Share

राज्यपालांनी अर्णबची चिंता करू नये, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे – भुजबळ

Published On: 

नाशिक: अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. शनिवारी, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजा कारागृहात रवानगी करताना केली होती. मला माझ्या वकिलांशी बोलू दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.

अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. यातच आता, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील याप्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

कोश्यारींनी अर्णबच्या अटकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. अर्णबला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असं देखील ते म्हणाले आहेत. तर, अर्नबच्या कुटुंबियांना अर्णबला भेटू द्यावे, असा उद्देश देखील त्यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी अर्णबच्या सुरक्षेबाबत व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर थेट राज्यपालांनी मध्यस्थी केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व मंत्री काय भूमिका घेणार याकडं राजकीय राज्यासह देशाचं देखील लक्ष लागलं आहे.

दरम्यान,या सर्व प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येवू लागल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!