Share

‘ब्राह्मण महासंघाच्या आक्रमक पवित्र्यानंतर खडसेंवर आली दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

मात्र, या टीकेनंतर आता खडसेंवर ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मण समाजासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेतले नाही तर पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला.

दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल, असे आनंद दवे यांनी म्हटले होते.
एकनाथ खडसेंनी या वक्त्याववरुन माघार घेत समाजाप्रती दिलगिरी व्यक्त केली नाही, तर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील, असा आक्रमक इशारा देखील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला होता.

दरम्यान , या सर्व प्रकारानंतर खडसे यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट केले आहे यात ते म्हणतात, दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आता खडसे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आता या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!