जळगाव : मराठवाडा आणि खान्देशात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, तरीही सातत्याने तापमानात वाढत होतेय. राज्यात अकोला, जळगाव आणि मालेगाव जिल्ह्यात तीव्र उष्णता आहे. अकोल्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस, मालेगावमध्ये ४२.८ तर जळगावात ४२.६ अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली.
पुण्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १ मे पर्यंत वातावरण ढगाळ असेल. या काळात तापमान देखील विक्रमी पातळीवर राहिल. यावर्षी उन्हाळ्यातील सरासरी तापमान एक अंशाने अधिक राहिल, असा अंदाज जागतिक अभ्यासकांनी अगोदरच वर्तवला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमान सलग ४२ अंशापुढे आहे. खान्देशात जळगाव, भुसावळ, मालेगाव आणि विदर्भात अकोला, ब्रम्हपुरी, चंद्रपुर, नागपूर या ठिकाणी उष्णता वाढली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बिहार ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत उत्तर-दक्षिण निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा वातावारणावर परिणाम झाला आहे. चार दिवसापासून वाढलेल्या उष्णतेपाठोपाठ आता येत्या ३० एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्रासह संपुर्ण राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावर हे संकट अधिक असेल. यंदा परतीच्या मान्सूननंतर प्रत्येक महिन्यात पंधरवाड्याच्या अंतराने राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्वाधिक वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २६ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची स्थिती राहिल, साेसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. त्यात वाऱ्याचा वेग ताशी २० किमीपेक्षा अधिक असेल, वादळामुळे नुकसान होवू शकते.
महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद! नाशिकच्या एकलहरे गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा निर्णय
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला
- बीडमधील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा, पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र


