Share

‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’

Published On: 

मुंबई – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, तरूण वयात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे एकनाथ गायकवाड शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत असतं. जनतेला सहज उपलब्ध असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. धारावीतील जनतेने त्यांना तीन वेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून दिले होते.

राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. पक्ष संघटनेतही त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या. अत्यंत कठिण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. दलित चळवळीतही ते सक्रीय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले आहे.एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठिण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!