Share

‘स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज हजारो नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत. अशात केंद्र सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. संकटकाळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत राहिले. तर कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती.

देशात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.

रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अंहकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे. आपल्याच जनतेचे मृत्यू होत आहेत. अशा घटनांमुळे कोणतेही सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी टीका ही त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!