Share

मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत

Published On: 

मुंबई : भारतात सध्या कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल स्पर्धा सुरु आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू नुवान झोयासावर बंदी घातली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर तब्बल ६ वर्षाची बंदी लादण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातच आयसीसीने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतेगेवर बंदी घातली होती. त्याला ८ वर्षांसाठी क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. तत्पुर्वी आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक हिथ स्ट्रिकवरही ८ वर्षांची बंदी घातली होती.

नुवान झोयासावर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आयसीसीने माजी श्रीलंकन क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक नुवान झोयसाला निलंबित केले होते. त्यामुळे झोयासाच्या बंदीचा कालावधी ३१ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू झाला आहे. संपूर्ण सुनावणीनंतर आणि लेखी व तोंडी युक्तिवादानंतर न्याय समीतीने त्याला काही आरोपांसाठी दोषी ठरवले आहे. एखाद्या सामन्याचा निकाल किंवा सामन्याचा एखादा भाग फिक्स करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करण्याच्या कराराचा भाग असणे हे कलम २.१.१ नुसार गुन्हा ठरतो.

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखाद्या सदस्याला २.१ नियमाचा भंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा प्रलोभन देणे किंवा विणवनी करणे हा दुसरा आरोप २.१.४ कमलनुसार लावण्यात आला आहे. तसेच भ्रष्टाचार संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याची कोणतीही माहिती पुरवण्यासही त्याने अक्षमता दाखवली असल्याने कलम २.४.४ नुसार त्याच्यावर तिसरा आरोप लावण्यात आला आहे. तसेच आयसीसीने इमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) वतीने आरोप लावला आहे की, टी१० लीगच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेमधील तीन कलमांचे उल्लंघन केले आहे. मात्र या आरोपावरील कारवाई अद्याप सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!