Share

अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत; मुश्रीफ म्हणाले, मी गुरुवारी येतोय

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाने चांगले काम केले आहे. तुम्ही खूप कष्ट घेतले आहेत त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो. आता मी गुरुवारी येतोय, तेव्हा सविस्तर आढावा घेऊ, असे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. मुश्रीफ यांनी आज नगर जिल्ह्याचा ऑनलाइन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना १५ ऑगस्टनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. त्यावरून त्यांच्यावर भाजप नेत्यांसह मनसेकडून टीका होत होती. जिल्ह्यात दररोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण सापडत असून जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगरकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, अशा आशयाचे पत्रच मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज अहमदनगर जिल्ह्याचा ऑनलाइन आढावा घेतला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांना जिल्ह्याची माहिती दिली.यावेळी मुश्रीफ यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. नगर जिल्ह्यात कोरोना या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्याबद्दल मुश्रीफ यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सहा महिन्यापासून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जे कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!