🕒 1 min read
मोताळा :- दोन कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निधीबाबत नगरपंचायत मोताळा जनतेची दिशाभूल करत असून त्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, विकास कामाबाबत सत्य जनतेसमोर आणण्यासाठी ऐन कोरोनाच्या काळात जनता दरबाराचे आयोजन भरविण्याचे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी केले आहे.
मोताळा नगरपंचायत नगराध्यक्ष व त्यांच्या सहकार्यांनी दोन कोटी रुपयांच्या विकास निधीबाबत आ.संजय गायकवाड खोटे बोलत असून या कामाबाबत नगरपंचायत ला काही माहीत नसल्याचा आरोप 12 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आ. गायकवाड काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
आ. संजय गायकवाड यांनी सर्व मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली 4 मे 2020 च्या जीआर नुसार सर्व कामे स्थगित आहेत त्यामुळे दोन कोटी रुपयांचे काम कसे काय येऊ शकते या नगरपंचायत च्या आरोपावर आमदार संजय गायकवाड यांनी 22 जून चा शासनादेश पत्रकार परिषदेत दाखवला. ज्यामध्ये विकासकामांना मंजुरात देण्याचा शासन आदेश होता, आपल्याला कोणत्याही प्रकारचे पत्र नाही या नगरपंचायतीच्या आरोपावर आ. संजय गायकवाड यांनी बांधकाम विभागाकडून 26 जून व 27 ऑगस्ट रोजी नगरपंचायत ला दिलेली पत्रे पत्रकारांना दाखविली ज्यामध्ये नगरपंचायत ने सभा बोलावून विकासकामांना मंजुरात देण्याचे आदेश दिले होते.
मोताळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी 9 जुलै व 7 ऑगस्ट रोजी नगराध्यक्षांना पत्र देऊन सभा बोलावण्याची विनंती केली होती, यावर नगरपंचायत ने काहीही कारवाई केली नाही. मोताळा नगरपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सभा बोलवण्याची मागणी केली होती. आपले पितळ उघडे पडू नये या भीतीने नगरपंचायत ने 14 सप्टेंबर रोजी सभा बोलावल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगितले.
नगरपंचायत जर ठराव देत नसेल तर कलम 309 नुसार विशेष सभा बोलावून आपण ठराव पारित करू शकतो आणि नियोजित कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू शकतो, हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावर जनता दरबार बोलवा, विकास कामे हे नगराध्यक्ष यांचं दुखणं नसून ,मला उत्तम दर्जाचे रस्ते तयार करायचे असल्यामुळे नगरपंचायतकडे तशी यंत्रणा व कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे मी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्याने विरोध करीत असल्याचा घणाघाती आरोप देखील आ. संजय गायकवाड यांनी यावेळी केला. त्यावेळी ते तिथं पत्रकार बांधव, शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच नगरपंचायत च्या नगरसेविका व नगरसेवक हजर होते.
महत्वाच्या बातम्या:-
- खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा राखीव ठेवा, या मंत्र्यांचे यवतमाळ मध्ये आदेश
- मुख्यमंत्रीसाहेब कोट्यांनी शेतकऱ्यांचं पोट भरत नाही; अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- वर्धा वासियांच्या समस्या सोडविताना या माजी आमदाराला कोरोनाने वेढले
- कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली, आता संसदेत आपले प्रश्न मांडणार
- काय सांगता, दोन दिवासांत अधिकाऱ्यांनी केले गडकरींनी सांगितलेले ‘हे’ काम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
