Share

खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा राखीव ठेवा, या मंत्र्यांचे यवतमाळ मध्ये आदेश   

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ:- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कोव्हीड हॉस्पिटल, जिल्ह्यातील विविध कोव्हीड केंद्रांमध्ये रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यंत्रणेला दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाबत आढावा घेताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार, अधिष्ठाता डॉ. राजेश सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता रुग्णांवर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील मोठ्या खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव, तर उर्वरित इतर रुग्णांसाठी असल्या पाहिजे. भविष्यात रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर खाजगी रुग्णालयातील 50 टक्के खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवले जातील. त्यानंतर ही रुग्णालये अधिग हितसुद्धा करण्यात येतील.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्वरित सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोनतीन दिवसांत 250 खाटांची बेडची व्यवस्था तातडीने करावी. प्रत्येक खाटेपर्यंत ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे. कोव्हीड हॉस्पिटल व्यतिरिक्त सर्जरी वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 ऑक्सिजन पॉईंट वाढवा. तसेच येथे ऑक्सिजन प्लँट तयार करता येईल का, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचे 500 सिलिंडर येत होते. मात्र ही संख्या आता दुप्पट करण्यात आली असून रोज एक हजार सिलिंडर येणार आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणार्‍या डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टीस करू नये, असे प्रकार आढळले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केवळ मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनीच कोरोनाबाधितांवर उपचार न करता, सर्जरी, आर्थोपेडिक व इतरही सर्वच विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर्स, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांनी संयुक्तरित्या रुग्णांवर उपचार करावे. येथे रिक्त असलेली डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आदी पदे तातडीने भरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील उपचाराबाबत रुग्ण समाधानी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!