अमरावती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोट्याशिवाय काही करत नाहित कोट्याने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही.आपण म्हणाले होता कि शेतकऱ्यांना फक्त कर्ज मुक्त नाही तर चिंता मुक्त करू, पण अजूनही दोन लाखाच्या पेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेलं नाही. ज्यांच माफ झालेलं आहे त्यांना बॅंका कर्ज देत नाहित. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन पर अनुदान देणार होतात ते ही अजून कोणाला मिळालेले नाही. आपण सांगितल होतं कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास बागायती पिकाला पन्नास हजार आणि कोरडवाहू पिकाला पंचवीस हजार रु. प्रति हेक्टर देऊ.पण कोणतीच मदत अजून मिळालेली नाही.
विदर्भात आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यावर अजून कोणालाच काहिच मदत मिळाली नाही आहे.आपण म्हणाला कि विकेल ते पिकेल पण आपण दिलेले सोय़ाबीन ची बियाणी उगवलीच नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई देखिल अजून मिळालेली नाही. अशी अनेक आश्वासन तुम्ही दिली आहेत. तूम्ही शेतकऱ्यांना गाजर दाखऊ नका तूम्हाला माझी विनंती आहे कि अशा काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहा.
पहा काय म्हणाले अनिल बोंडे :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/593731281320997
महत्वाच्या बातम्या :
- साईमंदिर खुले करा, मनसेचे शिर्डीत आंदोलन!
- एका महिलेने वाघाची शेळी केली, भाजप नेत्याचा घणाघात
- गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर
- कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – अमोल मिटकरी
- आरक्षणाबाबत आठ दिवसांत अध्यादेश काढा, अन्यथा जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार!


