वर्धा:- जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आ. डॉ. पंकज भोयर कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आज 13 रोजी आर्वी येथील माजी आमदार अमर काळे यांनी स्वत:च आपण कोरोनाबाधित असल्याचे समाजमाध्यमातून स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात 138 नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 2570 झाली आहे. आज हिंगणघाट, कारंजा आणि सेलू येथे तिघांचा तर जिल्ह्यात आजपर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला.
आज 707 जणांचे कोरोना चाचणी अहवाल आले असून त्यापैकी 133 सकारात्मक आहेत. कोरोना चाचणी नकारात्मक आल्याने आज 614 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यत 1253 कोरोनामुक्त झाले. क्रीयाशील सकारात्मक रुग्णांची संख्या 1280 आहेत.
माजी आमदार अमर काळे यांनी स्वतः समाजमध्यमातून चलचित्रफीत टाकून कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे सांगत गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने आज रविवार, 13 रोजी सकाळी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेतली असता अँटीजेनटेस्टमध्ये अहवाल सकारात्मक आला.
चिंतेचे काही कारण नसून माझी प्रकृती चांगली आहे असे सांगत गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजीपूर्वक स्वतःची चाचणी करून कोरोना संदर्भात अहवाल प्राप्त करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. माजी आमदार काळे यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने नांदपूर येथे झालेल्या अंगणवाडीच्या भुमिपुजनात उपस्थित असलेल्यांवर चिंतेचे सावट स्पष्ट दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- काय सांगता, दोन दिवासांत अधिकाऱ्यांनी केले गडकरींनी सांगितलेले ‘हे’ काम
- कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली, आता संसदेत आपले प्रश्न मांडणार
- ‘कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ प्रताप सरनाईकांचा भाजपला टोला
- श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह ईतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात- प्रकाश आंबेडकर
- आरक्षणाबाबत आठ दिवसांत अध्यादेश काढा, अन्यथा जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार!


