Share

कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली, आता संसदेत आपले प्रश्न मांडणार 

Published On: 

वर्धा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करुन उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनात वर्धा लोकसभा मतदार संघातील प्रमुख विषय मार्गी लावण्याकरिता आपले प्रयत्न असतील. मतदार संघाला न्याय मिळवून देण्याकरिता आपले प्रयत्न असतील अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष मतदारांमध्ये न जाता पत्रक काढून त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

अधिवेशन काळात दिल्ली येथे राहणे सर्व खासदारांना बंधनकारक असुन आपल्या मतदार संघातील जास्तीत जास्त विषय मांडण्यासाठी तसेच आपल्या भागातील समस्या संबंधीत केन्द्रीय मंत्र्यांपर्यत पोहचून समस्यांवर तोडगा निघेल अशी अपेक्षा खा. तडस यांनी व्यक्त केली.

आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे व संपुर्ण सत्रात सहभागी होता येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मास्क, विषाणूनाषक, सामाजिक दुरावा या तीनही गोष्टीचा नागरिकांनी प्रभावी पणे वापर करावा व आपली काळजी घ्यावी असे आवाहन खा. तडस यांनी केले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!