Share

‘तळीये’चे दुख: ‘माळीण’ने जाणले ; मदतीसाठी केला एक हात पुढे

Published On: 

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर देखील ३० जुलै २०१४ च्या रात्री मोठं संकट कोसळले होतं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर १५१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आणि आत तीच परीस्थिती महाड मधील तळीये या गावावर ओढवली आहे. महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अद्यापही शोधकार्य सुरु असून काही नागरिक बेपत्ता आहेत.

याच पार्श्वभूमीवर माळीण वासियांनी मुख्यमंत्री साह्याता निधीला 25 हजारांची मदत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे सुपुर्द केली आहे. लहानग्यांसह कुटुंबातील कर्ते व्यक्ती या दुदैवी घटनेत गेले तेव्हा पासुन आजपर्यत या वेदना माळीणवासि भोगत आहेत, आपण जे भोगलं ते कोणाच्याच वाट्याला येऊ नयेत तसेच सात वर्षापुर्वी अनेक मदतीचे हात माळीण वासियांकडे वळाले होते आता आमचीही काही जबाबदारी आहे अशी भावना मनात ठेवुन दरड कोसळुन अनेकांचे संसार उघड्यावर आलेत त्यांच्या मदतीसाठी माळीण मधील ग्रामस्थांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे 25 हजारांचा रुपयांचा धनादेश दिला आहे.

राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील तळीये गावाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. माळीणच्या नागरिकांनी तळीये गावावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावर आपल्या भावना व्यक्त करताना ‘आम्ही तुमचं दुःख जाणतो’ म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!