पुणे – यापुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत सरकार योग्य ती भूमिका घेत नाही तो पर्यंत रिंगरोडची मोजणी होवू देणार नसल्याची भूमिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी यावेळी घेतली आहे. सोमवार दिनांक २६/०७/२०२१ रोजी तळेगाव दाभाडे येथे मावळ तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी भेगडे यांनी ही भूमिका घेतली आहे.
या बैठकीला पाचाणे, चांदखेड , परंदवडी, बेबडओहोळ, उर्से वडगाव आंबी, सुदवडी, सुदुंबरे,इंदोरी,वराळे इत्यादी गावातील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. सरकारच्या माध्यमातून रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांमध्ये रिंगरोड बाबत तीव्र नाराजी आहे. प्रस्तावित रिंगरोड बाबत राज्यसरकार व अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून ज्या समस्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांचे समोर समोर निरसन करावे, कोणत्याही भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये व आपली फसवणूक होणार याची नाही दक्षता घ्यावी असे विविध मुद्दे या बैठकीमध्ये घेण्यात आले.
या बैठकीस शंकर शेलार, भास्करराव म्हाळसकर, ॲड.दिलीप ढमाले, प्रशांतअण्णा ढोरे,प्रदेश किसान मोर्चा संतोष दाभाडे,रवींद्रआप्पा भेगडे,नितीन मराठे,शिवाजीमामा पवार,नाना धामणकर,दत्तोबा गाडे पाटील चंद्रचूड महाराज, विश्वनाथ शेलार, राजेंद्र शहा, तानाजी येवले, संदीप येवले, दीपक जाधव, नंदकुमार येवले,नगरसेवक प्रसाद पिंगळे,वसंतराव भिलारे,अरुण वाघमारे,भूषण मुथा आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- पंचनाम्यानंतरच पूरग्रस्तांना मदतीबाबतची घोषणा – हसन मुश्रीफ
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

