Share

भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण: युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : विजयनगरमधील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर टोकण वाटण्यावरुन झालेल्या वादात भाजप ओबीसी आघाडीचे पदाधिकारी प्राध्यापक गोविंद केंद्रे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंजाळ यांच्यासह आणखी ३ व्यक्तींच्या नावे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयनगर लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींना टोकण वाटप करण्यात येते. त्यावरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणात मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर मारहाण झाल्याचा आरोप प्राध्यापक केंद्रे यांनी केला आहे. या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

सदरील प्रकरणात प्राध्यापक केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन राजेंद्र जंजाळ, अमोल पाटे, आकाश राऊत आणि एका अज्ञात इसमाविरुद्ध जवाहनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुखापत करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!