Share

आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू

Published On: 

गुवाहाटी – अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.

दरम्यान, सोमवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तब्बल सहा तास ही धुमश्चक्री सुरू होती. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांवर आरोप केले आणि केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.

हिंसाचाराचा व्हिडिओ ट्विट करत मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी गृहमंत्री शहा यांना हस्तक्षेप करण्याच्या मागणीची पोस्ट केली आहे. यानंतर अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढण्याची सूचना त्यांनी केली.

या संघर्षात मृत्यू झालेल्या पोलिसांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्याच्या संवैधानिक सीमेचं संरक्षण करताना राज्य पोलीस दलाचे सहा जवान शहीद झाले आहेत. मिझोराम पोलिसांनी लाईट मशिन गन वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री शर्मा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!