मुंबई : पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे 25 मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. मात्र, याच पदोन्नतीच्या वादामुळे काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. यानंतर, पदोन्नतीच्या जीआरला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.
‘पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही बैठकीची वेळ मागितली आहे लवकरच त्यांची भेट घेऊन चर्चा करू. या विषयावरील फाईलही मुख्यमंत्र्यांकडे येत्या एक दोन दिवसात जाईल आणि या विषयावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, आज याच मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली असून महाविकास आघडीतील कुरबुर ही कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. कारण राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीला विश्वासात न घेताच पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आले, असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाचे मंत्री म्हणून मी विजय वडेट्टीवार, के.सी. पाडवी आणि वर्षा गायकवाड यांनी पदोन्नतीतील आरक्षण विषयावर मंत्रीमंडळात सातत्याने आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. मात्र या उपसमितीची बैठक एक महिना घेण्यात आली नाही. यावर आम्ही आवाज बुलंद केल्यानंतर बैठक झाली. राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीला विश्वासात न घेताच पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आले. हा निर्णय बेकायदेशीर असून हे चुकीचे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यातील काँग्रेसचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटलो. पदोन्नतीतील आरक्षण प्रश्नी काँग्रेस कोणतीही तडजोड मान्य करणार नाही, हे त्यांना आम्ही सांगितले,’ असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामंतांना माहितीये भाजपचं पुन्हा येणार, त्यामुळेच ते…’; निलेश राणेंच्या व्हिडीओने खळबळ
- रस्त्यावर उतरण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडा; चव्हाणांचा मेटेंना टोला
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- सत्ताधारी आणि विरोधक मार्ग काढण्याऐवजी टिका करण्यात व्यस्त; संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत !
- पुणे : मंगेशकर रुग्णालयात सर्वसामान्यांना 900 रुपयात तर 200 डोस गरजूंना मोफत मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
