Share

अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने जगभरात थैमान घातले आहे. या रोगावर ठोस उपचार नसल्याने सुरुवातीला सर्व देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. भारतात देखील मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे.

या टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून आता पुन्हा एका देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशातच, अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध व लॉकडाऊन लावण्यात येत आहे. त्यामुळे, रोजगार गमावल्याने अनेकांच्या उदर्निवाहाचा प्रश्न देशात गंभीर झाल्याचे अनेक सर्व्हेंमधून समोर येतंय.

दरम्यान, अनेक उद्योगपतींनी देशाच्या बिकट काळात पुढाकार घेतला आहे. अगदी टाटांपासून ते रिलायन्स पर्यंत सर्वानी विविध मार्गातून मदत केली आहे. देशाच्या मदतीमध्ये टाटांचं नाव हे कायम अग्रेसर आहे. तर, बजाज, HCL, मुथहुट फायनान्स यांच्यासारख्या कंपन्यांनी कोरोनाकाळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खास सुविधा पुरवल्या आहेत. मग तो साधारण विमा असो वा मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पगार आणि मुलांचं शिक्षणाचा खर्च !

आपल्या मनात कायम एक प्रश्न असतो कि हे बडे उद्योजक नेमकं किती पैसे कमवत असतील. लॉकडाऊन काळात एका बाजूला बेरोजगारी वाढली तर दुसऱ्याबाजूला बड्या उद्योजकांच्या कमाईतही भरघोस वाढ झाली आहे. देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये अग्रेसर असलेल्या मुकेश अंबानी यांच्या ‘लाईफस्टाईल’ बद्दल कायमच चर्चा सुरू असतात.

मुकेश अंबानी यांच्या २७ मजली अँटेलिया या निवासस्थानाची भव्यता पाहूनच त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येतो. दरम्यान, Hurun India Rich List 2020 या यादीनुसार त्यांच्या तासाच्या कमाईचा खुलासा करण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी यांनी प्रत्येक तासाला ९० कोटींची कमाई केल्याचं या यादीत नमूद करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!