Share

रस्त्यावर उतरण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडा; चव्हाणांचा मेटेंना टोला

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

तर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून कोणत्याही परिस्थितीत ५ जून रोजी आरक्षणासाठी मोर्चा काढणार असा निर्धार केला आहे. आता मूक नाही तर बोलका मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यासोबतच त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. तसंच, माध्यमांशी बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी विनायक मेटेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मेटेंची भूमिका ही राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. ‘रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी. भाजप मुद्दाम आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी भाजण्याचे काम करू पाहत आहे,’ असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, ‘विनायक मेटे आणि संभाजीराजे यांच्या भूमिकेत फरक आहे. संभाजी राजे समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विनायक मेटे यांची भूमिका राजकीय असल्याचं दिसत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!