Share

‘सामंतांना माहितीये भाजपचं पुन्हा येणार, त्यामुळेच ते…’; निलेश राणेंच्या व्हिडीओने खळबळ

Published On: 

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकतेच कोकणच्या दौऱ्यावर गेले होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. थेट नुकसान झालेल्या लोकांशी जाऊन चर्चा केल्याने फडणवीस यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. यातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट घेतली असल्याचे वृत्त समोर आल्याने आता पुन्हा फडणवीस यांचा हा दौरा चर्चेत आला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे असून देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे.फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात झालेली बैठक पाहता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कोणतीही कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी निलेश राणे यांच्यावर बोचरी टीका देखील केली.

आता निलेश राणे यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओ टाकून उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या भाष्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ‘रत्नागिरीत अनेक माजी मुख्यमंत्री येतात पण उदय सामंत हे कधीच भेटायला येत नाहीत. मात्र, त्यांना माहितीये भाजप पुन्हा उद्या सत्तेत येणार आहे, त्यामुळेच गौडबंगाल लपवण्यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले. फडणवीसांना त्यांना भेटायचं नव्हतं. मात्र, मंत्री असल्याने कसबसं ते आत शिरले व देवेंद्रजींसमोर उभे ठाकले. यामुळे पर्याय नसल्याने फडणवीसांना त्यांच्याशी चर्चा करावी लागली. मला याबाबत खरं तर बोलायचं नव्हतं, मात्र माझ्यावर टीका केल्याने मी उघड करतोय,’ असं भाष्य करतानाच त्यांनी व्हिडीओमध्ये उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!