Share

पुणे : मंगेशकर रुग्णालयात सर्वसामान्यांना 900 रुपयात तर 200 डोस गरजूंना मोफत मिळणार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : विनामूल्य सरकारी कोरोना लस मिळण्यात अडथळे येत असल्याने अनेकांनी खासगी रुग्णालयांमधून लस मिळवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. गेल्या आठवड्यापासून पुण्यात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु झाले. लस उत्पादकांकडून थेट खरेदी करुन खाजगी रुग्णालये लसीकरण करत आहेत.

दरम्यान, खासगी रुग्णालयांना सिरम इंस्टिट्यूटकडून थेट लस 630 रुपयाला मिळत असल्याने शहरातील काही खासगी रुग्णालयात 800 तर काही ठिकाणी 900 रुपयात दिली जात आहे. दिनानाथ रुग्णालयाने सिरम इंस्टिट्यूटकडून 36 हजार लस खरेदी केल्या असून काल 1000 नागरिकांना लस देण्यात आली आहे.

दिनानाथ रुग्णालयाला जे सीरमकडून 36 हजार डोस मिळाले आहेत, त्यात अजून काही डोसची मागणी देखील सिरमकडे करण्यात आली आहे. दिनानाथ रुग्णालयाच्यावतीने दररोज 100 ते 200 डोस हे गरजूंना मोफत देण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने जास्तीत जास्त लसीकरण कशा पद्धतीने करण्यात येईल यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. 45 पुढील वयोगटासाठी आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी विशेष सोय देखील करण्यात आली आहे.

आजपासून मंगळवार दोन हजार लोकांना लस देण्यात येणार आहे. पूर्वी शासनाने जेव्हा लस घेतली होती तेव्हा त्यात 100 एडिशनल लावून खाजगी रुग्णालयात ती 250 रुपयाला मिळत होती पण आत्ता तीच लस 630 रुपयाला मिळत आहे. त्यामुळे ही थोडीशी रक्कम वाढलेली आहे. अशी माहिती दिनानाथ रुग्णलयाचे डॉक्टर योगेश पंचमाले यांनी दिली.

दरम्यान, शहरात सध्या खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू झालेले असताना, आज 25 मे रोजी मात्र महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसींच्या उपलब्धतेअभावी लसीकरण बंद आहे. महापालिकेला लसीचा पुरवठा न झाल्याने महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील लसीकरण ठप्प झाले आहे. तर गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू झालेले खासगी रुग्णालयांमधील लसीकरण मात्र सुरू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!