Share

परिचारिकांना न्याय देण्याची सरकारची भूमिका, देशमुखांच्या शिष्टाईनंतर संप मागे

Published On: 

लातूर: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते, तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये काम बंद देखील ठेवण्यात आले होते. या काम बंद आंदोलनामुळे मात्र रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यातून परिचारिकांच महत्व देखील समजलं. परिचरिकांनी काम बंद ठेवलं तर रुग्णांची सेवा कोण करणार. त्यामुळे कोरोना काळात देखील घर दार सोडून रुग्णांच्या सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या मागण्या अखेर पालकमंत्री अमित देशमुख यांनी मान्य केल्या.

कोरोना प्रदुर्भाव काळात परिचरिकांनी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे, या परिस्थितीत त्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे, असे मत पालकमंत्री देशमुख यांनी एका बैठकीत झालेल्या चर्चेत व्यक्त केलं. तसेच महाराष्ट्र परिचारिका संघटनेने केलेल्या सर्वच मागण्या अमित देशमुख यांनी तत्वतः मान्य केल्या आहेत. या मागण्याचे रीतसर प्रस्ताव त्वरित तयार करून घ्यावेत त्यास अंतिम मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

याच सोबत शुक्रवारी झालेल्या या बैठकीत चर्चा केल्या नंतर तसेच मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्याचे आवाहन या वेळी देशमुखांनी केले आहे. महाराष्ट्र परिचारिका संघटनेने देखील सकारात्मक पद्धतीने ही चर्चा केली तसेच हे काम बंद आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाला देखील सकारात्मक प्रतिसाद संघटनेने दिला आहे. तसेच सहजपणे मागण्या मंजुर होणे हे आमच्यासाठी सुखद धक्का असल्याचे सांगत संघटनेच्या प्रतिनिधींनीही संप मागे घेण्यास होकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!