🕒 1 min read
औरंगाबाद : कन्नड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लुटीतील आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम पोलीस प्रशासनाने जिल्हाबँकेकडे सुपूर्द केली आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आ.नितीन पाटील यांनी याप्रकरणी लक्ष देऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ग्रामीण पोलीस ठाणे कन्नडचे सुनील नेवसे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे भागवत फुंदे यांनी आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडून लुटीतील रक्कम हस्तगत केली होती.
दोन दिवसांत लुटीतील आरोपींचा माग काढत त्यांच्याकडून ९ लाख ३९ हजार ५०० रुपये हस्तगत केले होते. बुधवारी दि.२३ रोजी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालक कोळी यांनी सदर हस्तगत रक्कम जिल्हा बँकेचे कर्ज अधिकारी विश्वासराव सोनवणे, शाखाधिकारी सोपान मगर यांच्या स्वाधीन केली. यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस, मेहेगाव येथील सरपंच पांडुरंग घुगे, उपनिरीक्षक प्रदीप भिवसने उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
