🕒 1 min read
मुंबई : २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ महिने आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ‘पदासाठी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे आणीबाणी’ अशी टीका त्यांनी केलीय.
‘न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा यांची परस्परपूरकता आणीबाणीच्या काळात धोक्यात आली आणि त्याचा परिणाम सर्व भारतीयांना भोगावा लागला. आपले पद वाचवण्यासाठी कुटुंबकेंद्रित पक्षात सर्वोच्चस्थानी असणारी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा हा जिवंत वस्तुपाठ आहे’ असे पाटील म्हणाले.
न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा यांची परस्परपूरकता आणीबाणीच्या काळात धोक्यात आली आणि त्याचा परिणाम सर्व भारतीयांना भोगावा लागला. आपले पद वाचवण्यासाठी कुटुंबकेंद्रित पक्षात सर्वोच्चस्थानी असणारी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा हा जिवंत वस्तुपाठ आहे. #DarkDaysOfEmergency pic.twitter.com/7ZWeX4KA53
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 25, 2021
आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी ट्विटद्वारे आणीबाणीवर भाष्य केलेय. ‘१९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती. असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे’.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
- ‘अस्तित्वात नसलेल्या अहवालावरून भाजपच्या केजरीवालांना विनाकारण शिव्या’
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
