Share

‘सुप्रिया सुळेंना आणीबाणीचं काय माहितीये ?’; फडणवीसांचा पलटवार

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अनिल देशमुख हे मंत्रपदी असताना ज्ञानेश्वरी हे निवासस्थान देण्यात आलं. ते अजूनही या ठिकाणी वास्तव्यास असतात. या निवासस्थानी देखील ईडीने छापेमारी केली आहे.

ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. ‘राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. आणीबाणीहुन हा गंभीर प्रकार आहे. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवार साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे’ असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सुप्रिया सुळेंनी आणीबाणी पाहिली नाही. त्या व मी देखील लहान होतो. पण त्यांनी आणीबाणी भोगली नाही, आम्ही भोगलीये. २१ महिने कोणताही आरोप नसताना माझे वडील जेलमध्ये होते. असे लाखो लोक झेलमध्ये होते. जॉर्ज फर्नांडिस यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आलं होतं. तुम्हाला काय आणीबाणी माहितीये ? तुम्ही काय आणीबाणीचं बोलताय. आणीबाणी काळात लोकशाही पायदळी तुडवली गेली होती. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या कारवाईला आणीबाणी म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे,’ असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!