मुंबई : जोसेफ विजय चंद्रशेखर साऊथ चित्रपटांमध्ये विजय या नावाने ओळखला जाणारा हा अभिनेता खूप लोकप्रिय आहे. 1990च्या दशकात विजयने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटात त्याने काम केले. ‘नालया थिरूप’ या चित्रपटाने त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने अॅक्शन आणि रोमान्स शैलीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
चेन्नई चित्रपटसृष्टीत त्याने अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळवले. विजयने पूवे उनक्कागा 1996, कधालुक्कू मरियाधई 1997 , कुशी २०००, घिल्ली 2004 आणि पोकरी 2007 अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
आपण सगळेच विजयच्या करिअर बद्दल जाणतो पण विजयच्या आयुष्यातील एक खास गोष्ट आपल्याला माहिती आहे का? होय विजय आणि त्याची पत्नी संगीता कसे भेटले आणि विजयची हि पत्नी संगीता आहे तरी कोण? विजय ने ज्या मुलीसोबत आपली लग्नगाठ बांधली ती कोणी अभिनेत्री नव्हे तर ती त्याची फॅन होती.
संगिता परदेशात युकेमध्ये राहत होती आणि ती विजयची खुप मोठी फॅन होती. संगिताने एके दिवस विजयच्या सिनेमाच्या सेटवर त्याला भेटण्यास आली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना पसंत केले. एके दिवशी विजयच्या वडीलांनी संगिताला घरी बोलावून विजयसोबत लग्न करण्यासाठी मागणी घातली. संगिताने याला होकार दिला आणि 25 ऑगस्ट 1999 साली विजय आणि संगिताचे लग्न झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
- ‘अस्तित्वात नसलेल्या अहवालावरून भाजपच्या केजरीवालांना विनाकारण शिव्या’
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
