Share

प्रत्थापित मराठ्यांना विस्थापितांना आरक्षण द्यायचेच नाही, सदाभाऊ खोतांचा घणाघात

Published On: 

बुलढाणा : मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण यासंदर्भात गेल्या पन्नास वर्षांपासून सत्तेत असलेले प्रस्थापित मराठा नेते आणि महाविकास आघाडी सरकारवर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार घणाघात केलाय ते बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजातील बहुसंख्य विस्थापित असलेल्या समूहाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे, मात्र प्रस्थापित मराठ्यांना विस्थापित मराठा बांधवांना आरक्षण द्यायचेच नाही, कारण हे आरक्षण दिल्यास प्रस्थापित मराठा नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते या भीतीपोटी ते आरक्षण देण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

तर ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसी समाज बांधवांचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवणे अत्यंत गरजेचे होते मात्र तेही या महाविकास आघाडी सरकारने केलेले नाही, असे जोरदार ताशेरे देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!