नागपूर : मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. त्या ठिकाणी व्यवस्था केली गेली पाहिजे. मात्र, केवळ मुंबई आणि पुणे म्हणजे महाराष्ट्र नाही तर त्या बाहेरही महाराष्ट्र आहे, हे ठाकरे सरकारला माहितीच नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यामध्ये नागपूर, नाशिक, औरंगाबाद या सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. या जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणेत ताळमेळ दिसत नाही. असे असले तरी राज्य सरकारचे पूर्ण लक्ष हे मुंबई आणि पुण्यावरच आहे. या शहरातील कोरोना रुग्णांकडे आणि आरोग्य यंत्रणेकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारच्या निर्णयावरही त्यांनी या वेळी टीका केली.
केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑक्सिजन आयात करण्यासंदर्भातल्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका त्यांनी टाळली. या बाबत मलाही माहिती नाही. मात्र, तसे करता येत असेल तर केंद्र सरकार राज्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या संदर्भात योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे त्याकडेही राज्य सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादकही चिंतेत
- ‘हारी हुई बाजी जितना हमे आती है’ हिटमॅन रोहित शर्माची विजयानंतर प्रतिक्रिया
- धक्कादायक! कोरोनाच्या संकटात महिला तस्करी, बालविवाह वाढले
- कोरोनामुळे सलग दुसर्या वर्षी पाडव्याला परभणीमध्ये सराफा खरेदी – विक्री ठप्प
- ‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त तज्ज्ञांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

