दिल्ली : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती.
यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यासोबतच, भाजप मधील विविध नेत्यांनी देखील खत दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत अर्ध्याने कमी केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
सरकार किसानों के जीवन को बेहतर बनाने के लिए प्रतिबद्ध है। इसलिए अंतरराष्ट्रीय मूल्यों में बढ़ोतरी के बावजूद हमने उन्हें पुरानी दरों पर ही खाद मुहैया कराने का निर्णय लिया है। आज के फैसले के बाद DAP खाद का एक बैग 2400 रु की जगह 1200 रु में ही मिलेगा।https://t.co/cjJcqUsgEG
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2021
‘केंद्र सरकार शेतकऱ्यांचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारभावात वाढ झाल्यानंतरही आम्ही जुन्याच दराने खत देण्याचं ठरवलं आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताची एक बॅग २४०० ऐवजी १२०० रुपयांमध्ये मिळेल,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांच्या लसीकरणावरून संभ्रम; केंद्राने स्पष्ट केली नियमावली
- मोदी फक्त गुजरातचेच प्रधानमंत्री, अशा संकट काळात पण त्यांना फक्त गुजरातच दिसतोय !
- ‘मी मराठी शिकावं यासाठी माझे पती धनंजय मुंडे माझ्याकडे नेहमी आग्रह धरायचे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- …म्हणून मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार ; भाजप आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

