मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले. गुजरातमध्ये वादळामुळे १६ हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ४० हजार झाडे आणि १० हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत.
दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिर्फ गुजरात के प्रधानमंत्री हैं। गुजरात के अलावा उन्हें कोई दिखाई नहीं देता। कर्नाटक, गोआ, महाराष्ट्र सब जगह तूफान से तबाही हुई, लेकिन प्राकृतिक आपदा में भी प्रधानमंत्री को सिर्फ गुजरात दिख रहा है। ऐसे प्रधानमंत्री और सरकार का सबको धिक्कार करना चाहिए।
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 19, 2021
मोदींच्या या दौऱ्यावरून राज्यातील नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी हे फक्त गुजरातचेच प्रधानमंत्री आहेत व अशा संकट काळात पण त्यांना फक्त गुजरातच दिसतोय, अशी बोचरी टीका केली आहे. ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचे प्रधानमंत्री ! गुजरातच्या समोर त्यांना कोणीही दिसत नाही. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात देखील या वादळाने मोठं नुकसान झालं, मात्र अशा नैसर्गिक संकटात देखील त्यांना फक्त गुजरातच दिसलं. अशा प्रधानमंत्री आणि सरकारचा सर्वानी धिक्कार करायला हवा,’ अशा शब्दांत आंबेडकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘साहेब कुठे आहेत ते मला माहिती नाही’; नेटीझन्सच्या प्रश्नांना करुणा मुंडेंची बिनधास्त उत्तरं
- पुण्यात आज नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक, मात्र…
- ‘मी मराठी शिकावं यासाठी माझे पती धनंजय मुंडे माझ्याकडे नेहमी आग्रह धरायचे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- …म्हणून मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार ; भाजप आक्रमक


