दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावण्यात आला आहे. दरम्यान, लसीकरण करून घेण्याआधी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात ! यातीलच एक प्रश्न म्हणजे कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी साधारणतः कधी लसीकरण करावं ?
गेल्या काही दिवसांपासून यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कोणी सहा तर कोणी नऊ महिन्यानंतर कोरोनातुन मुक्त झालेल्या नागरिकांना लस द्यावी असं सांगत होतं. मात्र, आता केंद्र सरकारने राष्ट्रीय तज्ञ गटाच्या शिफारशींचा स्वीकार केला आहे. त्यानुसार, कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घ्यावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
यासोबतच, कोरोना प्रतिबंधक पहिला डोस घेतल्यानंतर कोविडची लागण झाली असेल तरीही दुसरा डोस घेण्यासाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. नियमावलीमध्ये जाहीर करण्यात आलेले महत्वाचे मुद्दे –
– ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांनी उपचारानंतर 3 महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
– कोरोनावरील उपचारादरम्यान ज्यांना प्लाझ्मा देण्यात आलाय, अशांनी बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी लस घ्यावी.
– ज्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर विषाणूची लागण झालीये, त्यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 महिन्यांनी दूसरा डोस घ्यावा.
– मुलांना दूध पाजणाऱ्या महिला लस घेऊ शकतात, पण गरोदर महिलांनी लस घेऊ नये.
महत्वाच्या बातम्या
- ‘साहेब कुठे आहेत ते मला माहिती नाही’; नेटीझन्सच्या प्रश्नांना करुणा मुंडेंची बिनधास्त उत्तरं
- मोदी फक्त गुजरातचेच प्रधानमंत्री, अशा संकट काळात पण त्यांना फक्त गुजरातच दिसतोय !
- ‘मी मराठी शिकावं यासाठी माझे पती धनंजय मुंडे माझ्याकडे नेहमी आग्रह धरायचे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- …म्हणून मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार ; भाजप आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

