मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते. दरम्यान, या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. सबळ पुराव्यांनिशी त्यांना एनआयएने अटक केली होती.
अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक देखी करण्यात आली होती. सचिन वाझेंच्या अटकेनंतर रियाजुद्दीन काझी एनआयएच्या रडारवर आले होते. सचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केलेले होते.
परंतु आता या सर्व प्रकरणाला वेगळा ट्वीस्टमिळाला आहे. तपास करणाऱ्या NIA मध्ये एक मोठी पण वेगळी घटना घडली आहे. NIA चे महानिरिक्षक (IG)अनिल शुक्ला यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ती देखील थेट मिझोराम येथे त्यांची हि बदली करण्यात आलेली आहे.
अनिल शुक्ला यांच्या जागी आता IPS अधिकारी ज्ञानेंद्र वर्मा यांची एनआयएच्या महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे सचिन वाझे आणि त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरु असताना अचानक एनआयएमध्ये करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अनिल शुक्ला यांनी अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIA च्या तपास कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही’
- आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड; ‘हे’ आहे कारण
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- 72 टक्के जपानी जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध – क्युडो न्यूज सर्व्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

