मुंबई – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. करोना रुग्ण वाढत असल्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये मर्यादित प्रमाणात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.
करोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केले आहे. हा लॉकडाउन कधी करायचा याबाबत कालपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे.
राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. वीकेंड लॉकडाउनही करण्यात आला आहे. मात्र, करोना रुग्णवाढीला फारसा ब्रेक लागत नसल्याने आणि आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन सरकार लॉकडाउनच्या विचारात आहे. लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून कडक टाळेबंदीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घेतील अशी माहिती मुंबईचे महापौर अस्लम शेख यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकताना डॉक्टरला केली पोलिसांनी अटक
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

