Share

स्टिव्ह स्मिथ ठरला सचीनला वरचढ; असा कारनामा करणारा जगातील एकमेव फलंदाज

Published On: 

रावळपिंडी : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील  पहिला सामना ४ मार्च  पासून रावळपिंडी येथे खेळला जात आहे.  या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६२ षटकांत ४ बाद ४७६ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाकडून स्टिव्ह स्मिथने ८ चौकारांसह ७८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीमुळे त्याने आता १० वेगवेगळ्या देशांत कसोटी अर्धशतक करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

याबरोबरच स्मिथचा हा कसोटी कारकिर्दीतील १४८ वा डाव होता. त्याने आत्तापर्यंत ६१ वेळा ५० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे त्याने कसोटी कारकिर्दीतील १५० डावांमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा कारनामा केला आहे. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला आहे.  सचिनने  त्याच्या पहिल्या १५० कसोटी डावांमध्ये ६० वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. या यादीत सुनील गावसकर ५९ तिसऱ्या आणि जो रुट ५६ चौथ्या क्रमांकावर आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!