मुंबई: मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने ६ विकेट घेतल्या आणि कपिल देवच्या४३४ कसोटी बळींचा विक्रम मागे टाकला. अश्विनच्या या कामगिरीचे सगळीकडून कौतुक झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला एका पत्रकाराने विचारले की परदेशातील कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवड का केली जात नाही, असे विचारले असता रोहितने भन्नाट उत्तर दिले आहे.
भारत आणि उपखंडातील खेळपट्ट्यांमध्ये अश्विनचे (R Ashwin) विक्रम असूनही न्यूझीलँड , दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या परदेशात खेळताना अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळत नाही. भारताने इंग्लंडमध्ये २-१ ने आघाडी घेतलेल्या मालिकेत खेळलेल्या चारही कसोटींसाठी त्याला अलीकडेच बेंच करण्यात आले होते. यासंबंधी प्रश्नावर रोहित (rohit sharma) म्हणाला “खरंच, त्याच्या परदेशातील संघात जागा आणि त्याला ते का सापडत नाही किंवा तो प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही याबद्दल मी काही सांगू शकत नाही. अर्थात, मला कल्पना नाही कारण मी त्या वेळी निवडीचा भाग नव्हतो आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय झाले किंवा तो का बेंच केला गेला आणि तो का खेळला नाही, असे सगळे वगैरे वगैरे मला माहिती नाही”
https://twitter.com/addicric/status/1500506299880001540?s=20&t=p7Uha98nwLSaiAhghdDEkg
यावेळी कर्णधार रोहित शर्माने अश्विनचे तोंड भरून कौतुक केले आहे. तो म्हणाला “इतकी मोठी उपलब्धी त्यांच्या क्रिकेट करियरमध्ये त्याने मिळवणे एक मोठी गोष्ट आहे. मी बऱ्याच काळापासून अश्विनला खेळताना पाहत आहे आणि जेव्हा मी त्याला बघतो तो मागच्या वेळेपेक्षा अजूनच उत्तम खेळताना दिसतो. त्याला त्याच्या क्षमेतवर विश्वास आहे आणि तो स्वतःसाठी आणि संघासाठी नेहमी प्रयत्न करतो. तो इतकी वर्षे खेळतोय आणि देशासाठी अनेक सामने जिंकणारी कामगिरी करतोय, त्यामुळे माझ्यासाठी तो सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे. लोकांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो पण मी जिथून पाहतो तो माझ्यासाठी सर्वकालीन महान खेळाडू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- “…पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही”, पवारांच्या टीकेवर सदाभाऊ खोत यांचे प्रत्युत्तर
- शेन वॉर्नवरील वादग्रस्त वक्तव्यासाठी सुनील गावस्करांनी मागितली माफी
- शरद पवार पोहोचले कुस्तीच्या मैदानात; म्हणाले, ‘मी अजूनही म्हातारा झालो नाही’
- रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : दमदार विजयासह उत्तर प्रदेश उपांत्यपूर्व फेरीत; तर महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात
- “तो सध्या कसोटीमध्ये पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ ऑल राऊंडर” आकाश चोप्राने केले जडेजाचे कौतुक


